05 September 2019 

 

शिक्षकदिन : काय आहे महत्त्व आणि का केला जातो साजरा?

 

 

दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी शिक्षकदिन साजरा केला जातो.

 

का केला जातो शिक्षकदिन साजरा ?

प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे स्थान महत्त्वाचे असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान शिक्षक होते. एक आदर्श शिक्षक होते. आदर्श  शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण त्यांच्यात होते. या दिवशी श्रेष्ठ शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

 

शिक्षकांचे महत्त्व

 

शिक्षक भावी पिढी घडवत असतात. डॉक्टर,  इंजिनियर तसेच विविध क्षेत्रातले जाणकार हे शिक्षकच घडवत असतात. आपले व्यक्तिमत्व, विचार, जडणघडण,  संस्कार, शिस्त याबाबत योग्य शिक्षण हे शिक्षक देत असतात.

 

असा साजरा केला जातो शिक्षकदिन ?

 

शिक्षकदिनी शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे, मनोगत व्यक्त करणे, शिक्षकांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी शिक्षकांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि ग्रीटिंग देऊन त्यांचे आभार मानतात.

 

 

शिक्षकदिनाबाबत शिक्षकांना काय वाटते?

 

शिक्षकदिनाला एकाच दिवशी का महत्त्व द्यायचे? इतर दिवशी शिक्षकांना महत्त्व नसते का? इतर दिवशी शिक्षकांना महत्त्व दिले पाहिजे. वेगवेगळे दिवस साजरे करणे हे पाश्चात्य संस्कृतीतून आले आहे. आजकाल शिक्षकदिनाचा इव्हेन्ट होऊ नये.  विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच इतर थोर विचारवंत यांची आठवण होते हेही महत्त्वाचे आहे. त्या दिवशीच भावना आचरणात आणले जाते, असे मत भवन्स महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्राध्यापक नेहा सावंत यांनी व्यक्त केले.

 

विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अनुभवावी

 

विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती, शिक्षणाप्रती त्यांच्या मनातील विचार व्यक्त करावेत. त्यांनी एक दिवस शिक्षक बनावे. त्यांनी शिक्षकांची भूमिका करावी आणि त्याचा अनुभव घ्यावा, असेही प्रा. नेहा सावंत यांनी सांगितले. शिक्षकांप्रती आदर व्यक्त  करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊ नयेत. शुभेच्छांचा वर्षाव करू नये. शिक्षक, शिक्षकांप्रती विचार मांडणे, संस्कार, संस्कृती जपणे महत्त्वाचे असते. खरे तर रोजच शिक्षकदिन असतो, हे विसरताकामा नये तसेच एखाद्या दिवशी शिक्षकांप्रती आदर दाखवला म्हणजे विद्यार्थ्यांची जबाबदारी संपली असं होत नाही. शिक्षक हा कायमच विद्यादान करणारा आणि ज्ञानार्जन करणारा असतो, त्याच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही हे भान विद्यार्थ्यांनी जपायला हवे, असेही त्यांनी सांगितले.