'राष्ट्रीय ऐक्या'साठी धावले मुंबईकरवल्लभभाई पटेल जयंती : राज्यपाल, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची प्रमुख उपस्थितीमुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी 'ऐक्यासाठी धाव' या उपक्रमाअंतर्गत 'राष्ट्रीय एकता धाव'चे आयोजन केले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सुरू झालेल्या या दौडमध्ये हजारो मुंबईकरांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि अनेक पुरस्कार विजेत्यांनी सहभाग घेतला.
देशात एकता निर्माण होण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदश्रीपणा आणि कार्याचा उपयोग होत असल्याचे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. देशातील अंतर्गत सुरक्षितता सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी स्वत:ला सर्मपित करण्याची शपथ घेत राज्यपाल यांनी मरिन ड्राइव्ह येथील ट्रायडंट हॉटेलजवळ दौडला हिरवा झेंडा दाखवला.
दरम्यान, दौडमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि माहिती, प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर स्नेहल आंबेकर, आमदार राज पुरोहित आणि मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मनपा आयुक्त सीताराम कुंटे, मुंबई शहर जिल्हाधिकारी शैला ए. यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस युनिट्स यांनी दौडमध्ये सामील होत सर्वांचाच उत्साह वाढवला. बचत गटांचे प्रतिनिधी, बँक कर्मचारी व अधिकारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक लक्ष वेधून घेत होते. तर अर्जुन पुरस्कार विजेते अँथलेटिक्स रचिता मेस्त्नी, एडवर्ड सिक्वेरा, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी विश्वजित शिंदे, आंतरराष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण अय्यर, अक्षता शेट्ये व क्षिप्रा जोशी (र्हदमिक जिम्नॅस्टिक), तेवरी पटेल (कराटे), सुमित अडसूळ (फेन्सिंग), राष्ट्रीय पदक विजेते ओम साधनेकर (धनुर्विद्या), विघ्नेश मुरकर (कुडो), रतन झा (ट्रॅडिशनल रेसलिंग), साक्षता कांबळे या पुरस्कार विजेत्यांच्या समावेशाने दौडला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले.