स्व. गजानन यशवंत मुरकर यांच्या कार्याचा परिचय

जन्म २ जुलै १९४० मृत्यू  ५ जुलै २००९

 

दिल्ली मोर्चा - १९६२   :  माझगाव भागातील युवकांचे नेतृत्व.

बँकांचे राष्ट्रीयकरण झालेच पाहिजे, कॉ. श्रीपात डांगे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे गेलेल्या मोर्चाचे माझगाव विभागातून नेतृत्व.

 

समाज सेवक - १९६५ ते  १९७० : गांघीवादी तात्या शिखरे संचालित गांधी स्मारक निधी, गांधी जन्मशताब्दी समिती द्वारे समाज सेवक म्हणून कार्यरत.

 

सन १९६९   : श्री. वसंतदादा पाटील यांच्याकडून  स्वयंसेवक म्हणून प्रमाणपत्र

 

सन  १९७४  :  युवकवाणी माझगाव या संस्थेची स्थापना.

सदर संस्थेच्या  माध्यमातून  अनेक  युवकांचे प्रबोधन  व अभ्यासक्रम शिबिरे राबविली

 

सन १९७८ ते १९८६ : धारावी जिल्हा युवक काँग्रेस ( एस ) अध्यक्ष पदावर काम केले.

 

सन  १९८२  'जनकल्याण आश्रम ' सेवाधाम खडवली, ता. कल्याण, जिल्हा ठाणे  या संस्थेच्या कार्यकारिणीवर निवड.

 

सन १९८७ ते १९९५ : सतत नऊ वर्षे महाराष्ट्र  शासनातर्फे विशेष कार्यकारी दंडाधिकारी  ( एस. इ . एम. ) म्हणून निवड.

 

सन १९९० : महाराष्ट्र राज्य ओ. बि. सी. संघटना अध्यक्ष श्री. जनार्दन पाटील  यांच्याकडून माझगाव डॉक ओ. बि. सी. संघटनेचा निमंत्रक  म्हणून नियुक्ती.

 

सन १९९१ :  एस. इ . एम. डिरेक्टरी कमिटी मुंबई तर्फे लाईफ मेंबर  करून  ' सर्वश्री  ' हा सन्मान व प्रमाणपत्र  देऊन गौरव केला.

 

सन १९९१ ते १९९४ :  कुडाळ देशस्थ वैश्य सहकारी पतपेढी, दादर, कांता मेन्शन येथे उपाध्यक्ष म्हणून काम केले.

 

सन १९९२ ते २००० : वैश्य समाज मुंबई येथे सरचिटणीस म्हणून समाजसेवा केली.

 

सन २००१ ते २००९: शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन चे सल्लागार या म्हणून काम केले. 

 

सन २००५ ते २००९ : वैश्यवाणी प्रतिष्ठान मुंबई चे अध्यक्ष म्हणून  समाजसेवा  केली.

 
 
 
 
 
 
 
Shito Ryu Sports Karate & Kickboxing Asso.(Regd.) [-cartcount]