Believe in yourself and your coach

Man is not physically disabled, but mentally disabled. Being mentally handicapped is hazardous. In my previous article, you got to know about the storm in life. Today I have brought something new for you. This time it is something humorous which happened while giving kick boxing training at Dharavi Sports Complex .There is a lesson to be learnt as well. After the practice at  the Sports Complex, some kids asked me to show a demo for back kick. I was a bit tired as we had a lot of practice. In order to not dishearten them, I told them softly that I will do it in the next class. But,the students were very persistent so I granted their request. I asked two kids to stand as markers in order to show  perfection and focus while hitting the target with a back kick. I was about to kick the gloves which were placed on the heads of the students standing as markers on my left side, as I mentioned .The student stood quietly and calmly. The other was standing on three feet. I told both of them to stand  without moving. They both dealt with their fears as they chose to embark on their play activities.Then a senior student of mine was trying to scare him by making a specific gesture behind me. As a result, the mind of the student standing on the right side got distracted, and at that moment his faith in his coach was shaken, for this reason, you can see that his hand was automatically going to his mouth. Learning anything requires unwavering faith in your instructor. It is important to stand firm even if you are scared or distracted at that time. I often test children in such cases. That's how much patience the kids have. But not all roots are same. Another pleasant experience I had in a karate class was, some students were strictly following the discipline in the class. This time my student Anuprita, who owns black belt,was told to stand up, and she also stood in front of me without fear. The children sitting in front were also asked to sit quietly, this time it was not using gloves as there were no gloves available in the class. I then demonstrated the kick. After the kick, all the children responded with applause. It is this enthusiasm and response of the children that compels me to learn something new every day. From this , I want to conclude that something big or small  happens in everyone life in one way or another, but it is up to us how we deal with those things or what we learnt from it. It has always been my opinion that good things should be encouraged and bad things should be ignored.

Date 13/08/2020            Umesh G. Murkar

स्वतःवर व प्रशिक्षकावरही विश्वास ठेवा

माणूस शारीरिकदृष्ट्या अपंग होत नाही,  तर मानसिकदृष्ट्या अपंग होतो. व मनाने अपंग होणे फारच घातक असते. माझ्या मागील लेखात जीवनात आलेल्या वादळाचा केलेला सामना आपणास पाहायला मिळाला. आज अजून एक नवीन गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. धारावी क्रीडा संकुलामध्ये मुलांचे किक बॉक्सिंग प्रशिक्षण देत असताना घडलेला एक मजेदार किस्सा व त्याने सर्व मार्शल आर्ट शिकणाऱ्या मुलांना काय बोध घेता येईल ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. धारावी क्रीडा संकुलन मुलांची प्रॅक्टिस झाल्यावर काही मुलांनी मला बॅक किक मारून दाखवायला सांगितलं. बर्‍याच सरावांमुळे मी आधीच थोडा कंटाळलो होतो आणि मी पूर्णपणे दमलोही होतो. म्हणून मी त्यांना सांगितले की प्रॅक्टिस संपली आहे. मी पुढच्या वर्गात करेन. विद्यार्थी खूप आग्रह करत होते म्हणून मी त्यांची विनंती मान्य केली. बॅक किक  मारताना तुमचा परफेक्शन व तुमचा टार्गेट कसा असावा, यासाठी मुलांना दोन मुलांना मी उभे केले. त्यातील डाव्या बाजूस उभा असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ग्लोव्हस मी किक मारून उडवणार होतो. हा विद्यार्थी शांत व निर्विकार पणे  उभा होता. तर दुसरा तीन फुटावर उभा होता. या दोघांनाही मी न हलता उभे राहण्यास सांगितले. दोघेही एकदम चांगल्या तर्हेने सरळ रेषेत उभे होते.  तेव्हा माझ्या पाठीमागून  माझा एक सीनियर विद्यार्थी माझ्या मागून एक विशिष्ट इशारा करून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे उजव्या बाजूस उभे असणाऱ्यांचे  चित्त विचलित झाले, त्या क्षणाला त्याचा आपल्या प्रशिक्षका वरील असणारा विश्वास डळमळीत होतो, या काराणा मुळे आपोआपच हात त्याच्या तोंडावर जात असल्याचे आपणास दिसत आहे. कोणतीही गोष्ट शिकताना आपल्या प्रशिक्षका वरील असणारा अतूट विश्वास जरुरी असतो. त्यावेळी घाबरून किंवा विचलित झाला तरीसुद्धा खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे.  मी बऱ्याच वेळेस मुलांची अशा बाबतीत परीक्षा पण घेत असतो. की मुलांमध्ये किती धैर्य आहे. पण सर्वच मुळे अशी नसतात. काही विद्यार्थी क्लास मधील शिस्तीचे पालन काटेकोर रित्या करत असतात, असाच दुसरा सुखद अनुभव मला कराटे क्लास मध्ये आला.  यावेळेस ब्लॅक बेल्ट असणारी माझी विद्यार्थिनी अनुप्रिता हीस मी उभे राहण्यास सांगितले, व तिनेही न घाबरता माझ्यासमोर उभी राहिली तिच्या बाजूला जूनैद नावाच्या मुलाला उभे केले व त्यांना न हलता उभे राहण्यास सांगितले. या वेळी समोर बसलेल्या मुलांनाही शांत बसण्यास सांगितले, या वेळेस क्लास मध्ये ग्लोव्हज उपलब्ध नसल्याने पाणी पिण्याच्या बॉटल चां उपयोग केला.  त्यानंतर मी किक चे प्रात्यक्षिक सादर केले. किक मारून झाल्यावर सर्व मुलांनी टाळ्या वाजऊन जल्लोषात प्रतिसाद दिला. मुलांचा हाच जल्लोष आणि प्रतिसाद मला प्रत्येक दिवशी काही नवीन शिकवण्यास भाग पाडत असते. अशाच काही गोष्टींचे अनुभव सर्वांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे घडत असतात.  पण ते आपल्यावर असते की आपण त्या गोष्टींना कसे सामोरे जातो. किंवा त्यातून काय बोध घेतो. म्हणून  नेहमी माझे मत असे आहे की चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे व वाईट बाबींना दुर्लक्ष करावे.
Date 13/08/2020            Umesh G. Murkar  👇



 
 
 
 
 
 
 
Shito Ryu Sports Karate & Kickboxing Asso.(Regd.) 0