आदरणीय रेंशी प्रकाश प्रभू यांच्याविषयी थोडक्यात माहिती
नाव : प्रकाश लक्ष्मण प्रभू
जन्म : ९ जून १९५३ मृत्यू २६ जानेवारी २०१९
रेशी प्रकाश प्रभू सर यांनी सन १९७० ते सन १९७४ या दरम्यान कराटे या खेळाचे शास्त्रोक्त शिक्षण वाकायामा जपान येथे ग्रॅंडमास्टर

यासुवारि हा याकावा यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले.
सन १९७० ते १९८५ पर्यंत कराटे हा क्रीडा प्रकार महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात कुठेही नव्हता. १९८५ पासून कराटे या खेळाची पेव मोठ्या प्रमाणात भारतात फोफावण्यास सुरुवात झाली सरांनी १९८५ साली कराटे या खेळाची इंडियन सेल्फ डिफेन्स अकॅडमी या नावाने संस्था धर्मादाय आयुक्त वरळी येथे नोंदणीकृत केली.
तसेच कराटे हा खेळ महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात व भारतातील २० राज्यात स्वरक्षण कलेचे वर्ग स्थापन करून कार्यान्वित केले. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा शिबिरे आयोजित करून या कलेचा मोठय़ा प्रमाणात प्रचार व प्रसार केला
सन १९९० साली सरांची आयबीएफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय संस्थेने नेमणूक केली.
आयबीएफ इंडियाने गेल्या अठ्ठावीस वर्षात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बुडो स्वरक्षण कलेचे विविध शाळा, समाजमंदिर, महाविद्यालय येथे प्रशिक्षण वर्ग कार्यान्वित केले.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार :-
सन १९९६-९७ मध्ये ग्रॅण्डमास्टर पीटर स्कॅन विली यांनी जर्मनी येथील वर्ल्ड बुडो फेडरेशनच्या स्पर्धेनंतरच्या समारंभात श्री प्रकाश प्रभू यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार व दहा हजार अमेरिकन डॉलर प्रदान केले .
गेल्या अठ्ठावीस वर्षात सरांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय व जागतिक बुडो स्पर्धेत भाग घेतला जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी नामांकन क्रमांक पटकावले.
महाराष्ट्रातील क्रीडा विकासासोबत सामाजिक कार्य :-
गेल्या वीस वर्षांत बुडो या खेळासोबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रक्तदान शिबीर वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना मोफत वहया- पुस्तके वाटप
महाराष्ट्रातील आदिवासी पाडा दत्तक :-
ठाणे जिल्ह्यात मामणोली येथील दहा एकर आदिवासी पाडा सरांनी दत्तक घेऊन तेथील विविध फळांचे व आयुर्वेद औषधांची लागवड कुकुटपालन बकरी पालन व अत्याधुनिक भातशेती अशाप्रकारचे अनेक उपजीविकेचे साधन आदिवासींना प्रत्यक्षात शिबिराद्वारे उपलब्ध करून दिले
गेल्या अठ्ठावीस वर्षात आयबीएफ च्या माध्यमातुन सरांनी या क्षेत्रात मिळवलेले यश केलेली सामाजिक कार्ये यांचे योगदान महत्त्वाचे ठरते.                                  आदरणीय प्रभू सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 

 
 
 
 
 
 
 
Shito Ryu Sports Karate & Kickboxing Asso.(Regd.) [-cartcount]